अकोला जिल्हयात ३ वाजेपर्यँत ४२.६ टक्के मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी । जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत पाचही मतदारसंघांमध्ये सरासरी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी ४२.६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अकोट- ४५. ४१ टक्के, २९-बाळापूर टक्के, ४६.६३ टक्के, अकोला पश्चिम- ३७.८६ टक्के, अकोला पूर्व- ४०.७१ टक्के, मूर्तिजापूर- ४०.६९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत निवडणूक रिंगणातील ६८ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मतदानास प्रारंभ झाला. सुरूवातील मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. सकाळी ९ वाजेपर्यंत अनेक मतदारांनी जिल्ह्यात मतदान केल होत. त्यानंतर हळूहळू मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले होते तर शहरी भागात तुलनेने मतदानाचा टक्का तुर्तास तरी कमी आहे.

Leave a Comment