Akshaya Tritiya Offer : अक्षय तृतीयेला SBI कार्डद्वारे खरेदी करून मिळवा बंपर कॅशबॅक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोठ्या प्रमाणावर सोने वापरले जाते. (Akshaya Tritiya Offer). सोने हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी अनेक लोकं मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. हे लक्षात घेऊनच SBI ने आपल्या ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे दागिने खरेदी करण्यावर ऑफर दिली आहे. यावेळी कार्डवारे वरून खरेदी केल्यास बँकेकडून ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. SBI कार्ड वापरून ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

यावेळी अक्षय्य तृतीया 3 मे 2022 रोजी साज री केली जाणार आहे. ती नेहमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. ज्योतिषांच्या मते, 2022 ची अक्षय्य तृतीया मंगळ रोहिणी नक्षत्राच्या शोभन योगात साजरी होईल. सुमारे 50 वर्षांनंतर ग्रहांचा असा शुभ संयोग होत असल्याचे ज्योतिषी सांगतात. (Akshaya Tritiya Offer).

याशिवाय सुमारे 30 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेवर असा शुभ योग येत आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ योग मानला जातो. अशा शुभ योगात स्नान आणि दान केल्याने पुण्यप्राप्ती अनेक पटींनी वाढते.

यावेळचे अक्षय्य तृतीयाचे शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya Offer) :

अक्षय्य तृतीया तिथी सुरू होईल : 3 मे 2022 रोजी सकाळी 5:18 वाजता
अक्षय्य तृतीया समाप्ती : 4 मे 2022 रोजी सकाळी 7.32 पर्यंत.
रोहिणी नक्षत्र : 3 मे 2022 रोजी सकाळी 12:34 ते 4 मे रोजी पहाटे 3:18 पर्यंत सुरू होईल.