चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘गुडन्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यस्त आहे. चित्रपटात तो काहीसा विनोदी दाखवण्यात आलाय. त्याचा विनोदी अंदाज देखील त्याच्या चाहत्यांना ठाऊक आहे. सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तर आता या भडकलेल्या कांद्याच्या दरावर अक्षयची विनोद बुद्धी जागी झाली आहे. त्याने पत्नी ट्विंकल खन्नाला चक्क कांद्याचे कानातले भेट म्हणून दिले आहेत.
शिवाय ट्विंकलला देखील हे कानातले फार आवडल्याचे दिसत आहेत. दरम्यान अक्षय ‘गुडन्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या सेटवर पोहोचला होता. यावेळी त्याने हे कांद्याचे कानातले अभिनेत्री करिना कपूर खानला दिले. परंतु करिना हे कानातले फारसे आवडले नाहीत.
त्यामुळे अक्षयने हे कानातले पत्नी ट्विंकल खन्नाला दिले. ट्विंकले कांद्याच्या कानातल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो इन्टरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये ‘माझ्या जीवनसाथी कपिलच्या शोनंतर घरी परतला आणि मला म्हणाला की, ‘मी हे कानातले करिनाला दाखवले होते. पण तिला हे कानातले फारसे आवडले नाहीत. म्हणून मी हे कानातले तुझ्यासाठी आणले आहेत. तुला माझी ही भेट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. काही लहान-लहान गोष्टी कायम ह्रदयात राहतात’ असं तिने लिहिले आहे.