Alert! डार्क वेबवर कोट्यवधी भारतीय यूजर्सचा डेटा चोरी, डेबिट आणि क्रेडिट कार्डची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय यूजर्सच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा (Credit & Debit Cards Users) डेटा चोरीची बातमी समोर आली आहे. सायबर सिक्युरिटी अफेयर्सचे सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर रजहरिया यांनी दावा केला आहे की, भारतात दहा कोटीहून अधिक क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूजर्सचा डेटा (Indian Users) डार्क वेबवर (Dark Web) विकला जात आहे. बंगळुरूच्या डिजिटल पेमेंट्स गेटवे जसपे (Juspay) च्या सर्व्हरवरून डार्क वेबवरील बहुतेक डेटा लीक (Data Leak) झाला आहे.

यापूर्वीही सायबर सिक्युरिटी रिसर्चरने डेटा चोरल्याचा दावा केला होता
डिसेंबर 2020 मध्ये राजशेखर यांनी असा दावा केला की,देशातील 70 लाखाहून अधिक यूजर्सचा क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा लीक झाला आहे. सिक्युरिटी रिसर्चरने असे म्हटले आहे की, लीक झालेल्या डेटामध्ये यूजर्सचे नाव, फोन नंबर आणि ईमेल ऍड्रेस व्यतिरिक्त त्यांच्या कार्डचे पहिले, शेवटचे चार अंक समाविष्ट आहेत. Amazon, MakeMyTrip आणि Swiggy यासारख्या व्यापाऱ्यांच्या मदतीने लीक केलेला हा डेटा पेमेंट प्लॅटफॉर्म जसपे शी जोडलेला असू शकतो.

https://t.co/5jAMLhfhj6?amp=1

डार्क वेबवरील डेटामध्ये या सर्व माहितीचा समावेश आहे
रिसर्चर राजशेखर म्हणतात की, हा डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. डार्क वेबवरील डेटामध्ये मार्च 2017 ते ऑगस्ट 2020 दरम्यानच्या व्यवहारांचा समावेश आहे. यात अनेक भारतीय यूजर्सचे कार्ड नंबर (सुरुवात आणि शेवटचे चार अंक), त्यांची समाप्ती तारीख आणि कस्टमर आयडी समाविष्ट आहेत. तथापि, वेगवेगळ्या ऑर्डर आणि त्यांच्यासाठी केलेल्या पेमेंट्सशी संबंधित माहिती यात नमूद केलेली नाही. डार्क वेबवरील डेटाच्या मदतीने कार्डधारक फिशिंग हल्ल्याचे बळी ठरू शकतात.

https://t.co/iJhldn8tVi?amp=1

बिटकॉइनमार्फत अघोषित किंमतीला विकला जात आहे डेटा
क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या माध्यमातून अघोषित किंमतीत डेटा डार्क वेबवर विकला जात असल्याचा दावा राजाहरिया यांनी केला आहे. हॅकर्स टेलिग्रामद्वारेही या डेटासाठी संपर्क साधत आहेत. यूजर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्योरिटी स्टॅण्डर्ड (PCIDSS) चे पालन करते. हॅकर्स जर कार्ड फिंगरप्रिंट तयार करण्यासाठी हॅश अल्गोरिदम वापरू शकतात तर ते देखील मास्कस्ड केलेला कार्ड नंबर देखील डिक्रिप्ट करू शकतात. अशा परिस्थितीत सर्व 10 कोटी कार्डधारकांचे अकाउंट्स धोक्यात येऊ शकतात.

https://t.co/EIwcjWMcjU?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment