आपल्याला भूगर्भातून तसेच इतरत्र अनेक काही गोष्टी सापडतात. ज्या गोष्टी पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. अशीच एक घटना गेल्या वर्षी पेरू येथील राजधानी लिमा या ठिकाणी घडली होती. त्या घटनेनंतर संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पेरू येथे दोन एलियन ममी सापडल्या होत्या. आणि यातील खास गोष्ट म्हणजे त्या एलियन ममीना तीन बोटे होती. त्यांची ही बोटे आणि त्यांचे स्वरूप पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झालेले होते. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आलेली होती.
त्याचप्रमाणे त्यांची असणारी गुपित उघड करण्यासाठी अनेक मोहिमा देखील राबवल्या गेल्या होत्या. परंतु हे एलियन्स नक्की पृथ्वीवर आले कसे आले होते? आणि कुठून आले होते? हा प्रश्न सगळ्यात शास्त्रज्ञांना पडला होता. त्याचप्रमाणे त्या एलियन देखील खूप लहान होत्या. परंतु ज्यावेळी या पेरूचे शास्त्रज्ञांनी नाझ्का या भागात तपासणी केली तेव्हा त्यांना कळले की ते प्रत्यक्षात एलियन नव्हते तर हाडांनी बनलेली एक बाहुली होती. परंतु तेव्हा देखील सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
आता देखील पेरूमधून अशीच एक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे त्यांच्या इथे आणखी ममी सापडलेल्या आहेत. यावर आता क्ष – कीरणांचा दावा करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी विश्वास केला आहे की, त्या आकाशगंगामधील इतर कुठल्यातरी वस्तू असू शकतात.
पेरू या ठिकाणी सापडलेल्या या ममी डोंगराच्या खाणीत सापडल्या असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये सुमारे 4 फूट उंच मानवासारखा एक सांगाडा दिसत आहे. सेरेना आणि मायकेल यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हॉलीवुड आणि कॅलिफोर्निया येथे या ममीबाबत अनेक खुलासे केलेले आहे.
त्यांनी दावा केला आहे की, हे प्राणी 1000 वर्षाहून अधिक जुने आहेत. त्यांच्या डीएनए पैकी 30% अज्ञात आहे. एका अहवालानुसार या नमुन्यांमध्ये जेनेटिक इंजीनियरिंगची चिन्ह असल्याची माहिती दिलेली आहे.
काय म्हणाली सेरेना
या सगळ्या प्रकारावर सेरेना म्हणाली की, आम्ही पेरूला खूप कमी अपेक्षेने गेलो होतो परंतु तेथे एक मोठे रहस्य उघडले आहे. हे रहस्य खरोखरच एखाद्या मानवतेची कहाणी बदलू शकते. आम्ही असे म्हणणार नाही की आम्हाला काही अलौकिक प्राणी सापडले आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आम्हाला एक नवीन प्रजाती ते सापडली आहे. आणि ही प्रजाती नक्की कुठून आली आहे कशी आली आहे हे शोधण्यासाठी आमची डीएनए चाचणी सुरू आहे. ते प्राणी कोणत्यातरी आकाशगंगेतून असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.