हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात रोड एक्सीडेंट किंवा कार एक्सीडेंट चे प्रमाण बरेच वाढत आहे. या एक्सीडेंट मध्ये बऱ्याच जणांचा जीव देखील जातो. हे रोड एक्सीडेंट कधी मानवांच्या चुकांमुळे, कधी रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमुळे तर कधी गाड्यांच्या खराबीमुळे होतो. या दुर्घटना रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारने संसद मध्ये हा मुद्दा मांडून भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम BNCAP सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात वाहनांची सुरक्षा लक्षात घेता नवनवीन नियम सरकार आणत असतात. त्याचबरोबर आता नवीन नियमाप्रमाणे 1 ऑक्टोंबर पासून नवीन वाहनांना BNCAP अनिवार्य करण्यात येणार आहे. यापूर्वी काही वाहनांसोबत ग्लोबल NCAP ही टेस्ट करण्यात आली होती. त्यानुसार त्या वाहनांना सेफ्टी रेटिंग देखील देण्यात आले होते. आता सरकारने आणलेल्या योजनेनुसार भारत NCAP ही क्रॅश टेस्ट करण्यात येणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मेहमूद अहमद यांनी याबद्दल माध्यमांना माहिती दिली. सरकारने सांगितलं की 3.5 टन पेक्षा कमी वजनाच्या मंजूर m1 श्रेणीच्या वाहनांना BNCAP लागू होणार आहे. यासाठी आता देशातील सर्व कार निर्माता कंपन्यांना केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीला फॉर्म 70 ए मध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर परीक्षण एजन्सी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅंडर्ड म्हणेज ASI 197 नुसार वाहनांचे मूल्यांकन करेल. आणि फॉर्म 70 बी यानुसार मूल्यांकन अहवाल नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीला सादर करण्यात येईल. त्याचबरोबर नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीला ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅंडर्ड ASI 197 यानुसार वाहणांना ऑटोमोटिव्ह स्टार रेटिंग देण्यात येईल.
काय आहे भारत NCAP
भारत NCAP म्हणजे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम आहे. याच्या माध्यमातून क्रॅश टेस्ट मूल्यांकन करता येईल. त्यानुसार वाहनांना 0 ते 5 स्टार रेटिंग देण्यात येईल. सरकारने आता भारत NCAP या चाचणीच्या प्रोटोकॉलला जागतिक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलसोबत जोडले आहे. त्याचबरोबर नवीन नियमानुसार वेबसाईटवर 1 ते 5 पर्यंतचे रेटिंग देण्यात येईल.
यामध्ये भारत NCAP साठी वेगवेगळे पॅरामीटर्स तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार कार पादचारीनुसार अनुकूल डिझाईन चे मूल्यांकन, कारचे स्ट्रक्चर आणि सेफ्टी, कार मध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी टेक्नॉलॉजी, कार मधील वयस्कर आणि लहान बालकांची सेफ्टी, कारला देण्यात आलेली 0 ते 5 रेटिंग या सर्व पॅरामीटर्सचा यात विचार करण्यात येणार आहे.