सोशल मीडियावर All Eyes on Rafah ट्रेंड का चालविला जात आहे? यामागील कारण काय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर All Eyes on Rafah ही ओळ ट्रेंडिंगचा भाग बनली आहे. लाखोंपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून All Eyes on Rafah लिहिलेला फोटो शेअर केला आहे. आता सर्वसामान्य लोकच नाहीत तर मोठमोठे सेलिब्रिटीसह राजकीय नेतेही या ट्रेंडचा भाग बनले आहेत. त्यामुळे हा ट्रेंड नेमका का चालवला जात आहे? यामागे नेमके कारण काय आहे? याबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहे. आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.

All Eyes on Rafah कोणी सुरू केला??

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर टॉपला असलेला ट्रेंड All Eyes on Rafah हा आहे. कारण की, राफा हे गाझा पट्टीमधील एक शहर आहे. या शहरावरच इस्रायली लष्कराने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये शेकडोपेक्षा अधिक सर्वसामान्य लोकांचा आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध नोंदवातच काही मानवी संघटनांकडून आणि WHO पॅलेस्टाईन कार्यालयाचे संचालक डॉ. रिक पेपरकॉर्न यांच्या निवेदनाद्वारे सोशल मीडियावर All Eyes on Rafah हा ट्रेंड चालवला जात आहे. आता या ट्रेंडचा भाग सर्वसामान्य नागरिकांपासून बॉलीवूड कलाकार, क्रिकेट विश्वातील खेळाडूही बनले आहेत. परंतु काही लोकांकडून या ट्रेंडला विरोधी दर्शवला जात आहे.

All Eyes on Rafah ट्रेंड चालवण्याचे कारण काय??

गाझामध्ये स्थित असलेल्या राफा शहराची लोकसंख्या सुमारे 14 लाख आहे. परंतु, इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्या सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक पॅलेस्टिनी लोकांनी राफा शहरात आश्रय घेतला आहे. याचं लोकांच्या तंबूंवर इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळेच अनेक लोकांना आपला जीव ही गमवावा लागेल. त्यामुळे जगभरातून इस्रायलच्या या कृत्याचा निषेध दर्शवला जात आहे. All Eyes on Rafah हा देखील निषेधचा एक भाग आहे.

ट्रेंडमध्ये कोणाचा सहभाग??

बॉलीवूड कलाकारांमध्ये आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, करीना कपूर, वरुण धवन, रश्मिका मंदान्ना, सोनाक्षी सिन्हा, समंथा रुथ प्रभू, तृप्ती डिमरी, दिया मिर्झा आणि रिचा चढ्ढा या सर्वांनी आपल्या सोशल मीडियावरून All Eyes on Rafah हा फोटो शेअर केला आहे. तर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, इरफान पठाण हे देखील या ट्रेंडचा एक भाग बनले आहेत.