सहा महिने सर्व प्रकारची कर्ज वसुली बंद करा; सोनियांचे मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. सोनियांनी आपल्या पत्रात पुढील ६ महिने सर्व प्रकराची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. सोनियांनी आपल्या चार पानांच्या पत्रातून पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे पुढील ६ महिन्यासाठी पीक कर्ज वसुली थांबवावी.

ज्या प्रकारचे करोनाचे संकट आहे त्याचा शेतकरी वर्गाबरोबरच इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजना राबवण्याची हीच वेळ असल्याचं सोनियांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. ‘न्याय’ योजनेअंतर्गत जनधन खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी साडे सात हजार रुपये जमा करा अशी मागणी सोनियांनी मोदींना केली आहे.

याशिवाय अनेक उद्योग बंद असल्यानं नोकरदार वर्गाला सुद्धा या कोरोनाचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळं पुढच्या ६ महिन्यासाठी नोकदारांसाठी ईएमआय वसुली बंद करावी तसेच त्यावरील व्याज हे माफ करावं अशी मागणी सोनियांनी पत्रात केली आहे. याचबरोबर या पत्रातील सर्वात शेवटीची मागणी म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देणार एक आर्थिक पॅकेज जाहीर करावं. तसेच त्यांना कशाप्रकारे कर सवलत देऊ शकता येईल याचा विचार करावा अशी विनंती सोनियांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment