मुंबई प्रतिनिधी । जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई- पुणे रेल्वे मार्ग हा सतत कोसळणारी संततधार, घाटांमध्ये दरड कोसळणे आणि अनेक भागात काही रेल्वे मार्ग हे पाण्याखाली गेले असल्यामुळे ठप्प होता. मात्र आजअखेर ही सर्व रेल्वे वाहतूक आज पासून पुन्हा पूर्वपदावर येऊन नियमितपणे धावणार आहे.
सतत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबई-पुणे घाटांमध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे विभागाने येथील जाणारी सर्व रेल्वे वाहतूक काही काळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आज या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीन, इंद्रायणी व सिंहगड एक्प्रेस ह्या वेळेत धावतील तर अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या ह्यासुद्धा वेळेत धावतील, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
Trains update-1 of 16.8.2019
All Mumbai-Pune intercity trains are restored. pic.twitter.com/uRQumBMERa— Central Railway (@Central_Railway) August 16, 2019