साखर, तेल आणि गहू निर्यातीबाबत केंद्राचे तीन्ही निर्णय शेतकरी विरोधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती कमी करण्याकरता निर्यातीवरती बंदी आणलेली आहे. साखर, तेल आणि गव्हाच्याबाबतीत हे तीन्ही निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

कराड येथे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर भाष्य केले. केंद्र सरकार आणि अर्थमंत्री यांच्यावर आ. चव्हाण यांनी सडकून टीका केली. आज महागाई वाढत आहे. मात्र, त्यावर केंद्र सरकारचे लक्ष नसून अर्थमंत्री यांनाही जबाबदार धरले आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, साखर आणि गव्हाच्या निर्यातवर बंदी आणली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूलाचे तेल कर न भरता आणण्यामुळे स्वस्त होईल, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर मिळणार नाही. गव्हाची निर्यात होत होती, ती बंद केली. तेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधी तीन्ही निर्णय आहे. गव्हाच्या बाबत निर्यात चालू राहीली पाहिजे. आपल्या मित्र देशांना गहू निर्यात केला पाहिजे. परंतु केंद्र सरकाच्या साखर, तेल आणि गव्हाच्या निर्णयामुळे शेतीमालाचे दर खाली पडू शकतात.

उज्वला गॅस योजना राजकीय कार्यक्रम

उज्वला गॅस योजना ही राजकीय कार्यक्रम आहे. आज 200 रूपये सबसिडी जाहीर केली आहे, ती चांगली गोष्ट आहे. परंतु सर्वसामान्यांना 1 हजारावर पैसे मोजावे लागतायत, एवढी भरमसाठ महागाई वाढली आहे. शेजारील पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ या देशामध्ये एवढी महागाई नाही. केंद्र सरकारकडून लूट चाललेली आहे.