बलात्काराचा आरोप असलेले भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना जामीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बलात्कार प्रकरणात अटक केलेले माजी गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना सोमवारी जामीन मिळाला आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी करताना चिन्मयानंद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

चिन्मयानंद यांच्यावर स्वत: च्याच स्वामी शुकदेवानंद लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात एसआयटीचा तपास सुरू आहे.

 

Leave a Comment