मराठा आरक्षण विरोधातील याचिका कर्त्यांना पैसे पुरवल्याचा आरोप; मराठा समन्वयकाची निदर्शने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । गेल्या ५ जूनला रोजी मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. या वरून संपूर्ण मराठा समजत असंतोष निर्माण झाला आहे. अशातच मराठा समाज आक्रोष व्यक्त करत आहे. आणि सरकार विरोधात निदर्शन देखील करण्यात येत आहे.

अशात औरंगाबाद शहरात आज प्रसिद्ध डॉक्टर काबरा यांनी मराठा आरक्षण विरोधात याचिका करणार्यांना आर्थिक मदत पुरवता असा आरोप करत. मराठा समन्वयकांनी त्याच्या हॉस्पिटल येथे जाऊन त्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्याच्या तोंडाला काळे फासण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी आडवले आणि त्यांना ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले.

यावर हॅलो महाराष्ट्राने मराठा समन्वयकांशी संवाद सोडला असता त्यांनी सांगितले कि, डॉ काबरा सारखे अनेक जण मराठा आरक्षण याचिकेचा विरोध करणार्यांना रसद पुरवतात. या सर्व रसद पुरवणाऱ्यांची यादी यांच्या हाती लागली आहे. त्यांना मराठा समाज लोकशाही मार्गाने आंदोलने करून धडा आम्ही धडा शिकवणार आहोत.

Leave a Comment