औरंगाबाद | कोरोना महामारीच्या काळात सदस्य रमेश गायकवाड यांनी आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय साहित्यांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.
शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अपूर्ण माहिती दिल्यामुळे केशवराव तायडे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी आरोग्य विभागाच्या खरेदी संदर्भात निधी कसा आला खर्च कोठे झाला यासंदर्भात माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी नामधारी असून या गैरप्रचारातील सूत्रधार वेगळे असल्याचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड म्हणाले असून भ्रष्टाचार झाला परंतु तोच जिल्हा आरोग्य अधिकारी शेळके यांच्या कार्यकाळातील नसून आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यावर रमेश गायकवाड यांनी आरोप करत कारभार व्यवस्थित असेल तर माहितीची लपाछपी का करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला.