शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला परवानगी द्या – खा. जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बुधवारी खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्ड अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांची भेट घेतली. राज्य शासनाने सोबतच भागीदारी तत्वावर मान्यता मिळालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला
लवकर सुरुवात करण्यासाठी आणि प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू करण्यासाठीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली.

खासदार इम्तियाज जलील यांनी विकासाच्या दृष्टीने, नागरिकांची मागणी आणि गरज, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रेल्वे केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा केला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने आणि शासनाने शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या 38.7 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. यावेळी रेल्वे प्रशासनाने भागीदारी तत्त्वावर 16 पॉइंट 55 कोटी निधीची मंजुरी देऊन राज्य शासनाला 22.5 कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती केली होती. याच निमित्ताने खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या रास राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यशासनाच्या भागीदारी तत्वावरील 22.5 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी करून घेतली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनित शर्मा यांना रेल्वे रुळापलीकडील 2 लाख हुन जास्त नागरीकांना प्रवास करताना येणाऱ्या गंभीर समस्या व अडअडचणींची सविस्तर माहिती देऊन शासनस्तरावरुन काम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी करुन नागरिकांचे प्रश्न मांडले.

यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा, पिटलाईन, विद्युतीकरण, मॉडर्न रेल्वेस्टेशन यासह मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी व रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेल्या मागण्या, प्रकल्प, प्रस्ताव व कामाबाबत सविस्तर चर्चा करुन कामे त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली. मराठवाड्यातील रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेली मागण्या व कामे पूर्ण होण्याकामी शासनस्तरावर मराठवाड्यातील सर्व खासदार व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात यावी याकरिता पत्र देखील दिले. खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वेच्या राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेऊन मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यात आजतागायत प्रस्ताव, प्रकरणे, मागण्या व कामे केंद्र शासन स्तरावरच प्रलंबित असल्याची माहिती दिल

Leave a Comment