Tuesday, March 21, 2023

भारताला कुस्तीत राैप्य पदक : फायनलला रवी कुमार दहियाची चुरशीची लढत अपुरी

- Advertisement -

टोकयो | ऑलिम्पिकमध्ये 57 किलो वजन गटात भारतीय खेळाडू रवी कुमार दहिया यांच्याकडून देशाला सुवर्णपदकाची आशा होती. सुवर्ण पदकाच्या अंतिम सामन्यात दोन वेळचा रशियाचा विश्वविजेता जावूर युगुयेवशी यांच्याशी अत्यंत चुरशीची लढाई झाली. या लढतीत रवि कुमार दहिया यांचा पराभव झाल्याने राैप्य पदकावर समाधान मानावे लागले.

रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला होता. भारताला आतापर्यंत 5 पदके मिळाली होती. आता रविकुमारने राैप्य पदक मिळाल्याने 6 वे पदक मिळाले. मात्र अंतिम सामन्यात सुरूवातीपासून फाॅर्ममध्ये असणाऱ्या रविचा पराभव झाल्याने देशवासियांच्या सुवर्ण पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.

- Advertisement -

भारताची कुस्तीत आजपर्यंत 6 पदके पुढीप्रमाणे

1952 साली हेलसिंकी येथे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पहिले पदक जिंकले होते. कराड तालुक्यातील खाशाबा जाधव यांनी भारतासाठी कुस्तीत पदक जिंकणारे पहिले कुस्तीपटू होते.

2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने कांस्यपदक

2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने रौप्यपदक जिंकले तर योगेश्वर दत्तने 2012 मध्ये कांस्य पदक,

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले.

2021 च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दहियाने राैप्यपदक जिंकले