‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात नोकरी करणं परवडत नाही. देशातील वाढलेली महागाई, नोकरीच्या असलेल्या कमी संध्या… यामुळे अनेक जणांचा मोर्चा हा व्यवसायाकडे वळला आहे. जर तुम्हीही व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसाया बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तब्बल 5 पट फायदा होऊ शकतो.

होय, आज आम्ही तुम्हाला एलोवेरा शेतीबद्दल सांगत आहोत. सध्या कोरफडीची मागणी झपाट्याने वाढत आहे. कॉस्मेटिक उत्पादन असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, कोरफड सर्वत्र वापरली जाते. त्यामुळेच बाजारात कोरफडीला मोठी मागणी आहे. कोरफडीच्या लागवडीतून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. त्याची लागवड आजकाल भारतात खूप लोकप्रिय आहे.

कोरफडीच्या शेतीसाठी शेतात जास्त ओलावा असण्याची गरज नाही. जिथे पाणी साचत नाही अशा शेतात हे पीक घेतले जाते. वालुकामय माती कोरफडीच्या लागवडीसाठी चांगली मानली जाते. कोरफडीच्या अनेक प्रजाती आहेत. बार्बाडेन्सिस (एलोवेरा बार्बाडेन्सिस) प्रजाती सध्या चांगल्या कमाईसाठी सर्वाधिक वापरली जात आहेत. ज्यूस बनवण्यापासून ते कॉस्मेटिक वस्तू बनवण्यापर्यंत त्याचा वापर केला जातो. या प्रजातीच्या कोरफडीची पाने मोठी असतात आणि त्यातून अधिक जेल बाहेर येते त्यामुळे शेतकरीही याची लागवड करण पसंत करतात.

कोरफडीची शेती कधी आणि कशी करावी-

कोरफडीची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून करता येते. मात्र, शेतकऱ्यांनी वर्षभर पेरणी केली तरी नुकसान होत नाही. पेरणी करतं एका रोपापासून दुस-या रोपातील अंतर २ फूट ठेवावे . एकदा लागवड केल्यानंतर त्यांची वर्षातून दोनदा काढणी करून नंतर त्यांची विक्री करून नफा मिळवता येतो. तसेच कोरफडीची लागवडीमध्ये प्राण्यांचे कोणतेही नुकसान नाही.

कोरफडीपासून 5 पट फायदा-

एका बिघा शेतात 12,000 कोरफडीची रोपे लावता येतात. कोरफडीच्या रोपाची किंमत 3 ते 4 रुपये आहे. म्हणजेच एका बिघामध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी सुमारे 40,000 रुपये खर्च येणार आहेत. कोरफडीच्या एका रोपातून ४ किलो पर्यंत पाने निघतात. एका पानाची किंमत सात ते आठ रुपयांपर्यंत आहे.

बंपर कमाई कशी करायची-

कोरफडीची पाने विकून तुम्ही नफा कमवू शकता. याशिवाय कोरफडीचे जेल तुम्ही थेट कंपन्यांना विकू शकता. ज्यातून भरपूर पैसे मिळतील. केवळ एक बिघामध्ये पाने विकून लाखो रुपये मिळतील. तुमचा व्यवसाय सुरू होताच, कोरफड लागवडीची व्याप्ती वाढेल आणि तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.

Leave a Comment