Alto K10 येणार नव्या फीचर्ससह; पहा नेमक्या काय आहेत खास गोष्टी

Alto K10
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील कार म्हणून याधीच जनमनांत आदराचे स्थान निर्माण करणारी कंपनी मारुती सुझुकी आपली सर्वात प्रसिद्ध कार Alto K10 नवीन फीचर्ससह लॉन्च करणार आहे. सध्याची बाजारातील स्पर्धा पाहता कंपनी आपल्या नवीन व्हर्जनमध्ये काही आकर्षक बद्दल करू इच्छिते . रिपोर्टनुसार कंपनीची नवीन कार लवकरच बाजारात येणार असून त्या दृष्टीने कंपनीच्या कारखान्यात कामाला सुरुवात होणार असून ही कार डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिनसह लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी मध्यमवर्गीय लोकांचे बजेट लक्षात घेऊन ही कार बनववणार असून मारुती अल्टो K10 साठी नवीन डिझाईन वर काम करण्यात येत असल्याचे सांगितलं जात आहे.

वैशिष्ट्ये

नव्या अल्टो K10 गाडी मध्ये प्रगत वैशिष्ट्ये वापरली जाऊ शकतात. या कारमध्ये तुम्हाला सिंगल पॅन सनरूफ, वायरलेस कनेक्टिव्हिटी, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, प्रीमियम ऑडिओ, सिस्टम व्हॉईस असिस्टंट, सपोर्ट डिजिटल डिस्प्ले यांसारखे अनेक चित्र पाहायला मिळू शकतात. Maruti Alto K10 मध्ये, तुम्हाला एक मजबूत 998cc इंजिन पाहायला मिळेल जे 55 bhp पॉवर आणि 130Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

पेट्रोल आणि डिझेल तसेच CNG मध्ये लॉन्च केले जाऊ शकते

ही कार पेट्रोल आणि डिझेल तसेच सीएनजीमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला NCAP कडून फक्त 2 स्टार रेटिंग मिळाले आहे. उपलब्ध बातमीनुसार कंपनीकडून या कारमध्ये 25 लीटरची इंधन टाकी दिली जाऊ शकते. त्याच वेळी, 1 लिटर पेट्रोलमध्ये ही कार 21 पॉइंट 88 किमी अंतर कापू शकते. मात्र, डिझेल आणि सीएनजी इंजिनांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही कार पाच प्रकारांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते, प्रत्येक वेरिएंटची किंमत वेगळी असेल. कारची सुरुवातीची किंमत 4.30 लाख रुपये एक्स-शोरूम असू शकते तर टॉप मॉडेलची किंमत 6.30 रुपये एक्स शोरूम असण्याची शक्यता आहे.