हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी विविध प्रथा पाळल्या जातात. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. दरम्यान, अशाच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या गावाची एक गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अल्याड पल्याड’ असे असून यातीळ एक थरकाप उडवणारे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्याला रसिकांची चांगली पसंती मिळते आहे.
‘काळोखाची रात्र’ गाणे रिलीज (Alyad Palyad Movie)
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. अलीकडेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. जो पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली. अशातच आता या चित्रपटही पहिले खतरनाक गाणे प्रदर्शित झाले आहे. टीझरमध्ये काळी जादू, बाहुल्या, कुंकू, रिंगण अशी भीतीदायक दृश्ये, किंकाळ्या आणि बॅकग्राऊंडला सुरु असलेले म्युझिक ऐकून अंगावर काटा उभा राहिला होता.
यानंतर आता चित्रपटातील (Alyad Palyad Movie)’काळोखाची रात्र’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘सत्यकथा, गावची प्रथा, अंतनिकट भूतबाधा, धरपकड भूत अस, केला असा जादूटोणा, तंत्रमंत्र धागा दोरा, लिंबू डाव वाया गेला, बंद झाला कामधंदा, करणी धरणी भलत्या बोंबा, देवा या गावात अल्याड पल्याड, काळोखाची रात्र अल्याड पल्याड..’, असे काहीसे मिनिटांत डोकं हलवतील असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याचे बोल अंगावर काटा आणणारे आहेत तर हा चित्रपट कसा असेल? याविषयी अंदाज बांधता येत आहे.
‘हे’ कलाकार साकारणार मध्यवर्ती भूमिका
चित्रपटाच्या शीर्षकासह ‘परत आला करनटक्याचा काळ..’ लिहिलेले पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट काहीसा वेगळा असणार याची खात्री आधीच सर्वांना पटली होती. यानंतर टिझर आणि आता पहिल्या गाण्यानंतर सर्वांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली आहे. (Alyad Palyad Movie) दरम्यान, या चित्रपटातून संदीप पाठक, मकरंद देशपांडे, MHJ फेम गौरव मोरे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार हा चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.