हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Alyad Palyad Trailer) मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकृती प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात. अशीच एक लक्षात राहील आणि अंगावर काटा आणेल अशी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. ज्यातील काही लक्षात येतात तर काही मात्र समजत सुद्धा नाहीत. अशीच एका दुर्गम भागातील घटना आणि त्यामागील रहस्याचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘अल्याड पल्याड’चा ट्रेलर रिलीज (Alyad Palyad Trailer)
गेल्या अनेक दिवसांपासून ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका गावातील विचित्र परंपरा आणि त्यामागील सत्य तसेच घडणाऱ्या घटनांना सुगावा घेणारे अनोखे कथानक आपल्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे. या ट्रेलरमध्ये आपण दुर्गम भागातील एका खेडे गावात घडणाऱ्या भीतीदायक घटनांची काही दृश्ये पाहू शकतो.
(Alyad Palyad Trailer) यांमध्ये एक एक जण कसा अडकत जातो आणि त्यांना सोडवण्यासाठी तसेच गावाला शापमुक्त करण्यासाठी सिद्ध नसलेला सिद्ध पुरुष काय काय करतो? हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे. ‘अल्याड पल्याड’च्या माध्यमातून थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या भावना व्यवस्थित मांडल्या आहेत.
कधी रिलीज होणार ?
‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळे कथानक आपल्या भेटीस येत आहे. हा भयपट असला तरीही कुठे ना कुठे थोडा कॉमेडीचा तडका लागणार आहे. शिवाय थरारक कथानक, उत्कंठा वाढवणारे संगीत आणि शोध घेणाऱ्या घटना हा चित्रपट पाहताना खिळवून ठेवतील अशी आशा आहे. हा चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Alyad Palyad Trailer) ‘या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल’, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी व्यक्त केला आहे.
चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?
माहितीनुसार, ‘अल्याड पल्याड’ या आगामी भयपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांनी केले आहे. (Alyad Palyad Trailer) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदी कलाकार मंडळी एकापेक्षा एक खतरनाक पात्र साकारताना दिसणार आहे.