मुंबई प्रतिनिधी | मी जो निर्णय घेईन तो नक्कीच महाराष्ट्राच्या हिताचा असेल. आचारसंहिता लागू द्या मग बघा काय काय होतय. गेल्या १५ दिवसांत जे काही चालु आहे त्याबद्दल तुमच्या मनातही खदखद असेलच म्हणून मी आज आपल्या समोर आलो. अस म्हणत राज यांनी उपस्थितांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तेराव्या वर्धापन दिना निमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
जागा वाटप संदर्भात राज यांची प्रकाश आंबेडकरांची खिल्ली
जागावाटप संदर्भात चर्चा चालु आहे. योग्य तो निर्णय घेईन तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. जागा वाटप संदर्भात त्यांनी प्रकाश आंबेडकरावर तोफ डागली. मला एवढे हवे तेवढे हवे अस काही चालु नाही. मी काही प्रकाश आंबेडकर नाही. अस म्हणत राज यांनी वंचित आघाडचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची खिल्ली उडवली. दरम्यान त्यांनी आंबेडकर,औवेसीचं काय चाललय हे कळत नसल्याचं म्हन्टल आहे.