औरंगाबाद : शहरात असलेल्या पाणी टंचाईमुळे ऐतिहासिक जामा मशीदीच्या विश्वस्तांनी गेल्या २५ वर्षात मशिदीच्या परिसरात ४० हातपंप घेतले, पण या सर्व हतपंपाला पाणी लागले नाही. पण गेल्या आठवड्यात अन्य कामासाठी केलेल्या अडीच तीन फुटाच्या खोदकामावर चक्क पाण्याचा झरा लागला आहे. अधिक खोदल्यानंतर पाण्याची उकलीच फुटली. पाच अश्वशक्तीचे दोन वीज पपं लावूनही पाणी तिथून हटले नाही.
जामा मशिदीत दर शुक्रवारी हजारोंच्या संख्येने भाविक विशेष नमाज अदा करण्यासाठी उपस्थित असतात. दर गुरुवारी मशिदीत मर्कजचा ईस्तेमा देखील भरतो. बाहेरून आलेले विद्यार्थी तेथे अरबी भाषेचे शिक्षण देखील घेतात. अनेक भाविक लग्न सोहळ्यासाठी जामा मशिदीला पसंती देतात.
ऐतिहासिक असलेली ही जामा मशीद औरंगाबादचे निर्माते मलिक अंबर यांच्या काळात उभारण्यात आलेली आहे.
मुघल बादशहा औरंगजेब यांनी या मशिदीचा पुढे विस्तार केला आहे. गेल्या दोन तीन वर्षांमध्ये मशीद, मदरसा परिसर नयनरम्य, सुंदर करण्यात आला आहे. बुढी लाईन परिसरातील काही विहिरींवरून पाइपलाइन करून मशिदीत पाणी घेण्यात आले होते. तरीही पाण्याची टंचाई भासत होती मात्र पाण्याचा नैसर्गिक साठा भेटल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्ती होत आहे.