नवी दिल्ली । सणासुदीच्या आधी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या विक्रेत्यांना भेट दिली आहे. कंपनीने रविवारी सांगितले की,”विक्रेते आता Amazon.in मार्केटप्लेसवर मल्याळम, तेलुगु आणि बंगाली या तीन भाषांमध्ये देखील त्यांचा ऑनलाइन व्यवसायाचे रजिस्ट्रेशन आणि मॅनेज करू शकतील.”
Amazon ने एका निवेदनात म्हटले आहे की,”आगामी सण डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामुळे सद्याचे विक्रेते, अनेक संभाव्य आणि नवीन विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी विविध स्तरांतील बाजारपेठेतून फायदा होईल. तसेच, ते त्यांच्या आवडीच्या भाषेत काम करू शकतील.”
8 भाषांमध्ये ऑनलाइन व्यवसाय मॅनेज करण्याचा पर्याय
या ऑफरसह, Amazon.in आता विक्रेत्यांना बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजीसह आठ भाषांमध्ये त्यांचा ऑनलाइन व्यवसाय मॅनेज करण्याचा पर्याय देते.
8.5 लाख विक्रेते आहेत
कंपनीने म्हटले आहे की,” कोणत्याही प्रादेशिक भाषेचा वापर करून, विक्रेते Amazon विक्रेता म्हणून रजिस्ट्रेशन करण्यापासून ते पहिली ऑर्डर मॅनेज करण्यापर्यंत सर्व काही करू शकतात. Amazon.in वर सध्या सुमारे 8.5 लाख विक्रेते आहेत.