Wednesday, February 1, 2023

Amazon Pay Later: आता खरेदी करा, एका महिन्यानंतर पैसे द्या

- Advertisement -

नवी दिल्ली । आजकाल देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेता. अशा हंगामात लोकांना अनेकदा पैशांची कमतरता भासते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या मित्रांकडून किंवा कुटूंबाकडून पैसे घेता. मात्र या व्यतिरिक्त बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आजकाल देशातील बर्‍याच कंपन्या Buy Now Pay Later ची सुविधा देतात. यावेळी, ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) देखील Buy Now Pay Later ची सुविधा देत आहे. कंपनीने या सेवेला ‘Amazon Pay Later’ असे नाव दिलेले आहे. याद्वारे कंपनी युझर्ससाठी क्रेडिट लिमिट देते. युझर्स हे एका क्रेडिट लिमिटमध्येच खर्च करू शकतात आणि पुढच्या महिन्यात पैसे देऊ शकतात.

आपण Amazon Pay Later कुठे वापरू शकता
अ‍ॅमेझॉन पे लेटर ही सर्व्हिस आपण Amazon.in वर किंवा अ‍ॅमेझॉन अ‍ॅप वापरु शकता, दररोजच्या आवश्यक वस्तूंपासून ते घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, दररोजच्या जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, वीज बिले, मोबाइल आणि युटिलिटी बिले डीटीएच सारखे रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता. मित्र, आपण ही सेवा गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी किंवा अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये पैसे लोड करण्यासाठी वापरू शकत नाही.

- Advertisement -

EMI चा देखील पर्याय
आपण अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर 3000 हून अधिकच्या शॉपिंगचे बिल पेमेंट केल्यास अ‍ॅमेझॉन पे लेटरचे ग्राहक ते EMI मध्ये रूपांतरित करू शकतो. EMI जास्तीत जास्त 12 महिन्यांसाठी असू शकतो. अ‍ॅमेझॉन पे लेटर आपल्या ग्राहकांना ऑटो-रिपेमेंटचा पर्याय देते. एकाच वेळी थकबाकीची परतफेड करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

Amazon Pay Later ला अशाप्रकारे अ‍ॅक्टिवेट करावे
1. आपल्या स्मार्टफोनवर अ‍ॅमेझॉन अ‍ॅप उघडा आणि अ‍ॅमेझॉन पे सेक्शनमध्ये जा.
2. वर दाखविलेल्या अ‍ॅमेझॉन पे लेटर वर क्लिक करा.
3. त्यानंतर Sign up in 60 seconds वर क्लिक करा.
4. आता PAN नंबर भरा.
5. त्यानंतर आधार नंबर भरा आणि ओटीपी द्या.
6. तुम्हाला लगेचच अ‍ॅमेझॉन पे लेटरची क्रेडिट लिमिट दिली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.