Amazon Vs Flipkart : देशात आयफोनच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अनेकजण हा फोन खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करत असतात. अशा वेळी जर तुम्हीही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही iPhone 15 आणि 14 स्वस्तात घरी घेऊन येऊ शकता.
ही खास ऑफर Amazon आणि Flipkart दोन्ही प्लॅटफॉर्म मिळत आहे. खास गोष्ट म्हणजे या डिस्काउंट ऑफर्सनंतर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 40 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. अॅपलने हा फोन भारतात तीन महिन्यांपूर्वीच लॉन्च केला होता. लॉन्च झाल्यापासूनची या फोनवर ही ऑफर आत्तापर्यंतची सर्वोत्तम ऑफर आहे.
जर या फोनबद्दल सांगायचं झालं तर 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि डायनॅमिक आयलँडसह, आयफोन 15 हे सध्याच्या सर्वात शक्तिशाली उपकरणांपैकी एक आहे, जे पूर्वी प्रो प्रकारापुरते मर्यादित होते. हे उपकरण उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
iPhone 15 ऑफर्स जाणून घ्या
तुम्ही Amazon द्वारे iPhone 15 खरेदी केल्यास, तुम्ही कोणत्याही ऑफरशिवाय फोन 77,490 रुपयांना खरेदी करू शकता. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे ते खरेदी केल्यास 5000 रुपयांची त्वरित सूट उपलब्ध आहे. तथापि, या डीलला सर्वात आश्चर्यकारक बनवणारी गोष्ट म्हणजे फोनवर अॅमेझॉनची एक्सचेंज ऑफर, जी किंमत 45,400 रुपये कमी करते. त्यानंतर तुम्ही 40 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत फोन खरेदी करू शकता.
दरम्यान, फ्लिपकार्टवरील ऑफरबद्दल सोन्याचं झालं तर यावर 37,500 रुपयांची एक्सचेंज डील आणि निवडक मॉडेल्सवर 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. फ्लिपकार्ट HDFC क्रेडिट कार्ड ईएमआय आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर 5,000 रुपयांची सूट देत आहे. या सर्व ऑफरनंतर, तुम्ही 40,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फोन तुमचा बनवू शकता.
आयफोन 14 ऑफर जाणून घ्या
सध्या तुम्ही कोणत्याही ऑफरशिवाय Apple iPhone 14 Rs 61,999 मध्ये खरेदी करू शकता. या फोनवर Amazon ची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, जी किंमत 45,400 रुपये कमी करते. त्यानंतर तुम्ही फोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. तर फ्लिपकार्टवर तुम्ही कोणत्याही ऑफरशिवाय हा डिवाइस 60,999 रुपयांना खरेदी करू शकता.