हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला होता. यावर नेते प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी बोलताना प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना हात दाखवला. यावरून अंबादास दानवे (Ambadas Danave) चिडले. यानंतर त्यांनी सभागृहात प्रसाद लाड यांना शिव्या घातल्या. या सर्व प्रकरणानंतर अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे
विधानसभेत झालेल्या सर्व प्रकरणानंतर अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. त्यानंतरच सभापतींनी निलंबनाची कारवाई केली आहे. आज दानवे यांचे निलंबन केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तसेच सभापतींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळासाठी सभागृहातील काम खोळंबले होते.
भाजपकडून मांडण्यात आलेला प्रस्ताव
दरम्यान, दानवे यांच्या निलंबनाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात भाजपने म्हटले आहे की, “१ जुलै रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात चर्चा करत असताना प्रसाद लाड यांच्याप्रती आक्षेपार्ह, अशोभनीय आणि अश्लाघ्य अपशब्द वापरून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. तसेच त्यांनी सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांच्या या बेशिस्त आणि असभ्य वर्तणाकडे दुर्लक्ष केल्यास सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे त्यांच्या वर्तणाची गंभीर दखल घेऊन अंबादास दानवे यांचे सदस्यत्व 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात यावे. या कालवधीत त्यांना सभागृहातील परिसरात येण्यास बंदी घालावी”