कोल्हासूर दैत्याचा पुत्र करवीरने विष्णूची पत्नी महालक्ष्मीची वाट अडवली होती, त्यांनतर काय झालं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Navratri 2023 | साडेतीन शक्तीपीठापैकी प्रथम पीठ मानले जाणारे आणि हिंदू १०८ शक्ती पीठांपैकी एक गणले जाणारे करवीर निवासीनी आंबाबाईचे देवस्थान महाराष्ट्रातील महत्वाचे देवस्थान आहे. काय आहे आंबाबाई देवस्थानचा इतिहास आणि कोल्हापुरात कोण कोणते केले जातात उत्सव याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

इसवी सन ६०० ते ७०० मध्ये चालुक्य राजवटीत महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर बांधण्यात आले. काळ्या पाषाणात मंदिराचे बांधकाम असून मंदिराचा सभामंडप कौलारू आहे. तसेच मंदिराचा परिसर प्रशस्थ असून मंदिरात प्रवेशासाठी सुबक दगडी प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या पाषाणी कोरीव कामावर देवी देवतांच्या मुर्त्या असून जैन धर्म्याच्या देवांचा देखील या कोरीव मुर्त्यांमध्ये समावेश आहे.

कोल्हासूर दैत्याचा पुत्र करवीर याने विष्णू पत्नी महालक्ष्मीची वाट अडवली होती. त्याला वाटेतून दूर होण्यास महालक्ष्मीने सांगताच त्याने देवीला स्वतःची पत्नी होण्याची इच्छा बोलून दाखवली. यामुळे देवी अधिकच क्रोधीत झाली. त्यामुळे तिने त्याला मारणे हेच उचित आहे आसि समजून त्याच्या सोबत युद्ध आरंभले. देवीचे शौर्य पाहून करवीर तिला शरण आला. तेव्हा त्याने देवीस आपला वध कर मात्र माझी एक इच्छा पूर्ण कर असे म्हणले. त्यावर देवीने त्याला इच्छा विचारी. तेव्हा तो म्हणाला की तुझ्या नावाच्या आधी माझे नाव घेतले जावे तसेच माझा ज्या ठिकाणी वध होणार आहे त्या ठिकाणी तुझा वास कायम रहावा आणि या नगरीला माझ्या नावाने ओळखले जावे. म्हणून कोल्हापूरला करवीर नावाने ओळखले जाते.

त्याच प्रमाणे देवीला करवीर निवासीनी अंबाबाई असे संबोधले जाते. मुलाचा वध झाल्याने कोल्हासूर क्रोधीत झाला तो देवी सोबत युद्ध करण्यास धावून आला. देवीने आपल्या शौर्याने त्याला देखील शौर्य गळीत केले. शेवटी तो देवीच्या चरणावर लोळण घेऊ लागला तेव्हा देवीने त्याला त्याची इच्छा विचाराली तेव्हा त्याने आपल्याला तुझ्या हातून मोक्ष मिळावा असे कोल्हासूर म्हणाला तेव्हा देवीने त्याचा वध करण्याआधी तुझ्या नावाने या गावाला ओळखले जाईल असे म्हणून कोल्हासुराचा वध केला. तेव्हापासून कोल्हापूरला करवीर आणि कोल्हापूर या दोन नावाने ओळखले जाऊ लागले.

भक्ताच्या नवसाला पावणारी देवी म्हणून महालक्ष्मीची ख्याती आहे. कोल्हापूरचे हे देवस्थान महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे वर्ष भरात जे उत्सव पार पडतात त्या उत्सवात चैत्र पौर्णिमा उत्सव,अश्विन पंचमी ,अश्विन पौर्णिमा, नवरात्री उत्सव आणि नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात पार पडणारा किरणोत्सव हे प्रमुख उत्सव आहेत. नवरात्री उत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटत असते.

Leave a Comment