आंबेडकरांची मोठी आघाडी तयारी करण्यावर जोर ; राजू शेट्टी,जानकर वंचित आघाडी मध्ये येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी  | लोकसभा निवडणुकीचं बिगुल हे वाजलेले असून २ दिवसांपूर्वी आचारसंहिता लागु झालेली आहे.महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे वेगाने बदलत आहे. कोणी प्रवेश करत आहेत तर कोणी जागांची गणितं चाललेली आहेत. जागावाटपांच्या बैठकींना जोर आलेल्या आहेत.  राज्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सोबत च्या अनेक बैठका या फोल ठरलेल्या आहेत. म्हणून कॉंग्रेसच्या मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेणार हे नक्की आहे.

मित्र पक्षानी आघाडी सोबत जायचं का स्वबळावर निवडणुका लढवायच्या याबाबत आज पुण्यात महत्वाची बैठक राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यात होणार आहे. ही बैठक गुप्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच बैठक संपल्यानन्तर हे दोनही नेते वंचित आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहेत.
वंचित आघाडी ने आज ३ च्या दरम्यान पत्रकार परिषदे चं आयोजन केल्याने राजकीय चर्चाना पुण्यात मोठ्या प्रमाणात उधान आल आहे.

राजू शेट्टी आणि आंबेडकर यांना कॉंग्रेसने जागावाटपासंदर्भात अजूनही ठोस अस आश्वसन दिल नसल्याने त्यांची नाराजी कॉंग्रेसला ओढवून घ्यावी लागणार आहे. महादेव जानकर भाजप सरकार पशुदुग्धविकासमंत्री आहेत परंतु लोकभेची माढा आणि बारामती ची जागा रासप ला सोडण्यासाठी आग्रह केला आहे. ही मागणी भाजप ने मान्य न केल्याचं समजत आहे. यांमुळे जानकर बारामतीतुन कमळाऐवजी कप बशी याच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं जवळजवळ निश्चित झाल आहे.

Leave a Comment