Ambenali Ghat : कोकण ते पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ‘हा’ घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

Ambenali Ghat Closed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ambenali Ghat । मागील काही दिवसापासून कोकण आणि पश्चिम महाराष्टात धुव्वाधार पाऊस पडत आहे. नद्या, नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या. याच एकूण पार्श्वभूमीवर रायगड आणि साताऱ्याला जोडणारा पोलादपूर आंबेनळी घाट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांसाठी खबरदारी म्हणून संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही या घाटातून प्रवास करणार असाल तर हि बातमी वाचूनच प्रवास करा.

रायगड जिल्ह्यात असलेल्या या (Ambenali Ghat) आंबेनळी घाटात ३ ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. यानंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून हा घाट रस्ता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक रात्रीच्या वेळेस बंद राहणार आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच घाटात दाट धुके पसरले आहे. परिणामी, दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा घाट दररोज रात्री बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच वेळ पाहूनच या घाटातून प्रवास करावा.

आंबेनळी घाटाची वैशिष्ट्ये – Ambenali Ghat

आंबेनळी घाट सह्याद्री पर्वतरांगांमधील पश्चिम घाटात वसलेला असून, रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. घाटाचा पायथा पोलादपूर येथे तर माथा महाबळेश्वर येथे आहे, जे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. घाटाच्या दोन्ही बाजूंना आंब्याची झाडे आणि नळीसारख्या वळणावळणाच्या रस्त्यामुळे याला “आंबेनळी” असे नाव पडले असावे. हिरव्यागार जंगलांनी, धबधब्यांनी आणि कृष्णा नदीच्या निर्मळ प्रवाहाने आंबेनळी घाट नटलेला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. येथील वळणदार रस्ते आणि हिरवळीने नटलेली खोरे यामुळे रोड ट्रिपचा आनंद द्विगुणित होतो. पावसाळ्यात धबधबे आणि धुके यांचा अनुभव अविस्मरणीय असतो, परंतु खराब रास्ता आणि दरड कोसळण्याचा धोका असल्याने आंबेनळी घाट पर्यटकांसाठी चुकीची ट्रीपही ठरते. या घाटात अपघाताच्या आणि दरडी कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.