Ambernath Firing : फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार!! दोघेजण बाईकवरुन आले अन… CCTV समोर

Ambernath Firing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ambernath Firing । अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अगदी दोन दिवसांवर आली असताना,एक हादरवणारी घटना समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वीच भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. भाजप उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावर मध्यरात्री हा गोळीबार झाला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केल जात आहे.

नेमकं काय घडलं ? Ambernath Firing

बरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. मध्यरात्री दुचाकीवरून दोन अज्ञात माणसे आली आणि त्यांनी अचानक कार्यालयाच्या दिशेने 3-4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही फायरिंग केलं. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गोळीबारात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं निर्माण झालं आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. Ambernath Firing

गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली . प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात केली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला झाल्याने काही प्रमाणात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. महत्वाची बाब म्हणजे अंबरनाथमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेच्या आधीच गोळीबाराची घटना घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनेचा राजकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने तपास केला जात आहे.