Amboli Waterfall : पर्यटकांचा हिरमोड!! अंबोली धबधब्याबाबत प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Amboli Waterfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amboli Waterfall। पावसाळ्यात निर्सगाच्या सानिध्यात जाण्यासाठी, निसर्गरम्य वातावरणाशी एकरूप होण्यासाठी अनेकजण धबधब्यांना भेट देत असतात… धबधब्याच्या पाण्यात मनसोक्त आनंद घेत असतात…. महाराष्ट्रातील लोकप्रिय धबधब्यांच्या यादीत अंबोली धबधबा सुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात असलेल्या या मुख्य धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र याठिकाणी वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शनिवार-रविवार सायंकाळी ५ वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

दृष्यमानता कमी होत असल्याने निर्णय – Amboli Waterfall

पावसाळ्यात अंबोली धबधबा परिसरात दृष्यमानता कमी होत असल्याने आणि अपघातांचा धोका वाढत असल्यामुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद आणि महादेवगड पॉईंट या ठिकाणी शनिवार आणि रविवार सायंकाळी ५ वाजल्यानंतर पर्यटकांना बंदी असणार आहे, कोणालाही त्याकाळात प्रवेश दिला जाणार नाही. संध्याकाळी ५ वाजता धबधबा परिसरात (Amboli Waterfall) असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येईल तसेच कोणालाही ५ नंतर वर जाण्यास परवानगी नसेल. एवढच नव्हे तर अंबोली धबधबा परिसरातील सर्व स्टॉल्सही सायंकाळी ५ वाजता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी म्हंटल कि, आंबोली घाटातील काही भागांत पावसामुळे धुके आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी असलेल्या भागांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश वेळोवेळी दिले जातील.

दरम्यान, आंबोली धबधबा (Amboli Waterfall) हे निसर्ग आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा धबधबा, पावसाळ्यात विशेष आकर्षक दिसतो, कारण मुसळधार पावसामुळे याठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढतो. हिरवीगार जंगले, धुके, डोंगररांगा आणि धबधबा यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण पर्वणी आहे. परिसरातील आंबोली, गेळे आणि चौकुळ ही तीन गावे नयनरम्य निसर्गसौंदर्य, घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे आणि जैवविविधतेसाठी पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून लाखो पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. पावसाळ्यातील पहिले दोन-तीन महिने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते.