डेड बॉडी आणायला चाललेल्या अँब्युलन्सला पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; कारखान्याच्या ट्रेक्टरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा ताबा सुटला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | डेड बॉडी आणायला निघालेल्या अँब्युलन्सला पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला आहे. कराड शहरातील नटराज टॉकीजच्या समोर मंगळवारी संध्याकाळी ५:३० च्या दरम्यान हा अपघात झाला असून यामध्ये ऍम्ब्युलन्स ड्राइव्हर किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गावर कारखान्याच्या ट्रेक्टॉरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान एक ऍम्ब्युलन्स डेड बॉडी आणण्यासाठी निघालेली असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कराड येथे नटराज टॉकीजसमोर तिला अपघात झाला. कारखान्याच्या ट्रॅक्टर मधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता कि ऍम्ब्युलन्स दुभाजकाला घासत सुमारे ५० फूट दूर गेली. यामध्ये ड्राइव्हर किरकोळ जखमी झाला असून त्याला उपरासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले.

डेड बॉडी आणायला चाललेल्या अँब्युलन्सला पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात

मी कृष्णा चॅरिटेबल मध्ये डेड बॉडी आणण्यासाठी निघालो होतो. अँब्युलन्सचा वेग साधारण ५० ते ६० होता. यावेळी रस्त्यात मला मध्येच मळी सांडलेली दिसली. ते पाहून मी गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर मळीचा तब्बल एक ते दीड फूट थर होता. गाडी मुलीवर जाताच मी ब्रेक दाबला. तेव्हा गाडी एका बाजूने ओढली गेली आणि दुभाजकावर धडकली अशी माहिती अँब्युलन्सचे ड्राइव्हर जगताप यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना दिली.

दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठप्प झालेली वाहतूक मार्गी लावली. तसेच हायवे हेल्पलाइनचे दस्तकी डागा यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने महामार्गावरील मळी धुवून काढली. कारखान्याचे ट्रॅक्टर नेहमीच गच्च भरून मळीची वाहतूक करत असतात. यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात होतात असे डागा यांनी म्हणत अशा ट्रॅक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. सदर ट्रॅक्टरचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तर अपघात घडला तेव्हा काही पोलीस इथेच होते. त्यांनी तात्काळ पाठलाग केला असता तर मळीचा ट्रॅक्टर तेव्हाच सापडला असता असे सदर एम्ब्युलन्स ड्राइव्हर यांनी सांगितले.

Leave a Comment