रूग्णवाहिकेला पेट्रोलसाठी ताटकळत ठेवले ; सेव्हनहिलच्या पेट्रोलपंपावरील प्रकार

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद – शहरामध्ये दिवसभर पेट्रोलपंप बंद असल्यामुळे सेव्हनहिल पेट्रोलपंपावर रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी उभी असताना या रुग्णवाहिकेला डिझेल मिळाले नाही. परिणामी रूग्णवाहिका काही तास पंपावर तशीच उभी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवेऐवजी विनाकारण फिरणाNया नागरिकांचीच गर्दी पेट्रोलपंपावर होत असल्याचे या प्रकारावरून दिसून आले.

शहरातील सेव्हनहिल येथील आंबरवाडीकर येथील पेट्रोलपंपावर आज सकाळी एक रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर आली होती, मात्र या रुग्णवाहिकेला डिझेल देण्यात आले नाही. या रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर संबंधित विभागाच्या अधिकाNयांना मोबाईलद्वारे रुग्णवाहिकेला डिझेल द्या, अशी विनवणी करत होता, मात्र डिझेल देण्यात आले नसल्याचे दिसून आले.

एकीकडे कोणतेही काम नसताना काही महाभाग आपली वाहने डिझेल, पेट्रोल टाकून फुल्ल करून घेत आहेत. प्रशासन जरी कोरोनाच्या लढ्यासाठी सर्व प्रयत्न करत असताना काही नागरिक विनाकारण पेट्रोलपंपावर वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे बघायला मिळाले. शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन असताना सर्वच व्यवसाय, व्यवहार बंद केले असले तरीही शहरातील काही नागरिकांच्या बेतालपणामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात होते.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like