संरक्षण मंत्रालयाची सर्वात मोठी घोषणा; भारत स्वत: बनवणार ‘हे’ फायटर विमान

amca fighter jet
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे पाकिस्तान विरुद्व तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे केंद्र सरकारने देशाच्या संरक्षण ताफ्याला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. आता भारताने स्वदेशी जेट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलासाठी पाचव्या पिढीतील स्वदेशी डीप पेनिट्रेशन अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट फायटर विमान विकसित करण्याच्या एका मेगा प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी DRDO कडे सोवण्यात आली आहे.

भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आणि मजबूत देशांतर्गत एरोस्पेस औद्योगिक परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रगत मध्यम लढाऊ विमान (AMCA) कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला मान्यता दिली आहे. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) उद्योग भागीदारीद्वारे हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. AMCA प्रोटोटाइप डेव्हलप करण्यासाठी स्वदेशी कौशल्य, आणि क्षमता यांचा वापर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे एरोस्पेस क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल. २०३० पर्यंत भारतीय हवाई दलाला जागतिक दर्जाचे स्वदेशी विमान उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे राफेल सारख्या आयात केलेल्या विमानांवरील अवलंबित्व कमी होईल.

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारी करून ADA ने हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे. यामुळे फक्त टेक्निकली उपक्रमांनाच चालना मिळणार नाही तर स्वदेशी संरक्षण उद्योगात रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. एएमसीएच्या प्रोटोटाइपच्या विकासासाठी स्वदेशी तज्ज्ञ आणि उन्नत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यात स्टिल्थ तंत्रज्ञान, सुपरक्रूज क्षमता, उन्नत सेन्सर आणि शस्त्र प्रणाली असणार आहे. त्यामुळे देशाच्या शस्त्र सज्जतेला मोठा फायदा होणार आहे.