बिल गेट्सने चिंता व्यक्त केली,म्हणाले,”सध्या लस आपल्याला कोरोनापासून वाचवेल याची गॅरेंटी नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाचे डोळे कोरोनाव्हायरस लसीवर लागलेले आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये या लसींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. परंतु अद्यापपर्यंत या लसीबाबत कोणतेही ठोस असे रिझल्ट्स समोर आलले नाहीत. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे की ही लस आल्यानंतरही याची गॅरेंटी कोणाकडे नसेल कि कोरोना पुन्हा होणार नाह. बिल गेट्स आणि त्यांची संस्था बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनही कोरोनावरची लस तयार करण्यासाठी सुमारे 40 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारीत आहे.

बिल गेट्सचे लॉजिक
सीएनएनशी बोलताना बिल गेट्स म्हणाले की,” या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस कोरोनाची लस येईल. गेट्स यांच्या मते या लसीचे दोन फायदे आहेत. पहिली म्हणजे ती आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवेल आणि दुसरे म्हणजे ती कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत करेल.” मात्र ते असेही म्हणाले की, “ही लस घेतल्यानंतरही तुम्ही कोरोनापासून वाचू शकता याची कोणतीही शाश्वती नाही. खरं तर, सध्याला लसची त्वरित आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरकडे वेगवेगळ्या वयोगटातील आणि गर्भवती महिलांवर क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी वेळ कमी असतो. अशा परिस्थितीत अचूक सेफ्टी डाटा बेस तयार करणे कठीण होईल.”

अमेरिका कोरोना रोखण्यात अजूनही अयशस्वी
दरम्यान, बिल गेट्सने जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ” अमेरिकेने या साथीला रोखण्यासाठी कोणतीही विशिष्ट अशी पावले उचललेली नाहीत.” गेट्स म्हणाले की,” अधिकधिक चाचणी करणे आवश्यक आहे. अमेरिकेतील बरेच लोक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.” अधिक चाचण्यांमुळे अमेरिकेत कोरोनामधील रूग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचा व्हाइट हाऊसने केलेला दावा त्यांनी यावेळी फेटाळून लावला. ते म्हणाले की,”हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे.”

अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत
कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. विशेषत: अमेरिकेत या धोकादायक विषाणूमुळे अधिक विनाश झालेला आहे. एकाच दिवसात येथे सर्वाधिक 37077 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. याशिवाय एकाच दिवसात येथे 2430 लोकही मरण पावलेले. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत अमेरिकेत 2.4 दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत येथे 124,410 लोक मरण पावलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment