अमेरिकेने काबूल स्फोटांचा घेतला बदला, ISIS च्या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराला ठार केल्याचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । स्वतःला इस्लामिक स्टेट (US Drone Strike ISIS) म्हणवणाऱ्या दहशतवादी संघटनेवर अमेरिकेने शनिवारी पहाटे ड्रोन हल्ले केले. काबूल विमानतळावरील आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने 48 तासांपेक्षा कमी वेळात प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामध्ये हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ठार झाल्याचा दावा केला जात आहे. विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान 169 लोकं मारले गेले. या दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावणाऱ्यांमध्ये 13 अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे. इस्लामिक स्टेटच्या खोरासन मॉडेलने (ISIS-K) या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचबरोबर अमेरिकेने काबूल विमानतळावर आणखी एका हल्ल्याची शक्यता व्यक्त केली असून तेथील नागरिकांना तातडीने तेथून निघण्याचे आवाहन केले आहे.

लष्कराने नांगर प्रांतात हे हल्ले केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, अमेरिकन नागरिकांना विमानतळावरून ‘तत्काळ’ वेगवेगळ्या गेट्समधून बाहेर जाण्यास सांगितले गेले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी एक निवेदन जारी केले, ‘अमेरिकन सैन्य दलांनी ISIS-K नियोजकाच्या विरोधात दहशतवादविरोधी कारवाई केली. हा मानवरहित हवाई हल्ला अफगाणिस्तानच्या नानगहार प्रांतात झाला. आम्ही लक्ष्यित व्यक्तीला ठार केल्याचे सुरुवातीचे संकेत आहेत. एकही नागरिक मारला गेला नसल्याची माहितीही आमच्याकडे आहे.

कॅप्टन अर्बन म्हणाले,”हा मानवरहित हल्ला अफगाणिस्तानच्या नानगहार प्रांतात झाला.” त्यांनी माहिती दिली की,”आम्ही लक्ष्य नष्ट केल्याचे सुरुवातीचे संकेत आहेत. कोणत्याही नागरिकाच्या मृत्यूची आम्हाला माहिती नाही.” एअरपोर्टवर झालेल्या स्फोटाला दोन दशकांतील सर्वात मोठा हल्ला म्हटले जात आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी शुक्रवारी सांगितले की,” अमेरिकन अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, काबुलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. आमचे सैनिक अजूनही धोक्यात आहेत.”

व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने इशारा दिला आहे की, अमेरिकन सैन्य मागे घेण्याची आणि एअरलिफ्ट बंद करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी आणखी रक्तपात होऊ शकतो. साकी म्हणाले की,” लोकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत येणारे काही दिवस आतापर्यंतचा सर्वात धोकादायक काळ असेल.”

याआधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी हल्ल्यात ठार झालेल्या 13 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे वचन दिले आणि त्यासाठी जबाबदार दहशतवाद्यांना सांगितले, “आम्ही तुम्हाला ठार मारू आणि तुम्ही त्याची किंमत मोजाल.” बिडेन यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले. ज्यांनी हा हल्ला केला तसेच ज्यांना अमेरिकेचे नुकसान करायचे आहे त्यांना मला सांगायांचे आहे की, ते सुटणार नाहीत. आम्ही हे विसरणार नाही. आम्ही तुम्हाला ठार मारू आणि तुम्ही किंमत मोजाल. मी आमचे हित आणि आमच्या लोकांचे रक्षण करीन.”

Leave a Comment