तडाखा! अम्फानमुळे कोलकाता विमानतळाचे मोठं नुकसान, रनवे पाण्याखाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । अम्फान वादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना बसला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या अनेक भागात पूर आला आहे. कोलकाता विमानतळावर या वादळाचा मोठा परिणाम दिसतोय. 6 तासांच्या अम्फान वादळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानतळावर पाणी भरलेलं आहे. रनवे आणि हॅंगर्स पाण्यात बुडाले आहेत. विमानतळाच्या दृशांवरून काही विमानांचे नुकसान झाले आहे. अम्फानमुळे विमानतळावरील सर्व कामकाज आज पहाटे 5 वाजेपर्यंत बंद होती, जी अजूनही बंद आहेत.

कोलकाता विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 25 मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहेत. वंदे भारत मिशनला जाण्यासाठी फक्त मालवाहतूक आणि उड्डाणे सुरू होती. त्यांनाही आता थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंगालमधील समुद्रकिनार्‍यावर धडक देताना अम्फानच्या वादळाची गती ताशी 180 किमीपेक्षा अधिक होती. ताशी 160 ते 180 किमीच्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळामुळे 10 ते 12 जण ठार झाल्याची माहिती आहे. कित्येक तास कोलकाता शहरात ताशी 130 किमी वेगाने वारे वाहत राहिले. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना, दक्षिण 24 परगना, मिदनापूर आणि कोलकाता येथे अम्फानचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. वादळाचा तडाखा इतका होता की उभे राहणेही शक्य नव्हते.

पश्चिम बंगालमधील वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असे म्हणत आहेत की कमीतकमी 10-12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृत्यू झाडे पडल्याने झाले आहेत. त्याचवेळी ओडिशामध्ये ३ लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही राज्यात मदत व बचावकार्य सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment