पाणी फाउंडेशनच्या कामाला दिली अमीर खानने भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, 
१ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर कप या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. वॉटर कप स्पर्धेला काल पासूनच सर्वत्र सुरवात झाली. गावातील महिला, तरुण, अबाल वृद्धांसह सर्वच जण दुष्काळाला हरवण्यासाठी जिद्दीने या स्पर्धेत सहभागी झाले. काल सायंकाळी तासगाव तालुक्यातील सावर्डे ग्रामस्थांना श्रमदानावेळी एक सुखद धक्का बसला.
सावर्डे गावातील गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दस्तुरखुद्द सुपरस्टार वॉटर कप स्पर्धेचे जनक अमीर खान सपत्नीक नागरिकांशी संवाद साधायला अचानक आले आणि गावकऱ्यांची त्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली. लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त  व पाणीदार बनणार आहे . प्रत्येक गाव एक झाल्यास सर्वच समस्या सुटतील असे मत अभिनेता आमीर खान यांनी व्यक्त केले. पत्नी किरण राव यांच्यासोबत त्यांनी तासगाव तालुक्यातील सावर्डे गावाला भेट दिली यावेळी ते बोलत होते.
 पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदानातून तासगाव तालुक्यात दुष्काळ मुक्तीसाठी नागरिक झटत आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाला राज्यात सर्वत्र सुरवात झाली. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंदी चित्रपट श्रुष्टीतील दिग्गज अभिनेते अमीर खान यांनी सपत्नीक सावर्डे गावाला भेट दिली आणि नागरिकांची मनमोकळेपणाने संवाद साधत पाण्याचं महत्व पटवून दिल. आशा व आत्मविश्वास जर गमावून बसला तर तो कितीही ताकतीचा असून उपयोग होत नाही. पण या गोष्टी कमजोर माणसाकडे जरी असतील  तर तो हिमालय सर करू शकेल. लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त  व पाणीदार बनणार आहे . प्रत्येक गाव एक झाल्यास सर्वच समस्या सुटतील असे मत अभिनेता आमीर खान यांनी व्यक्त केले. पत्नी किरण राव यांच्यासोबत त्यांनी तासगाव तालुक्यातील सावर्डे गावाला भेट दिली यावेळी ते बोलत होते.
पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदानातून तासगाव तालुक्यात दुष्काळ मुक्तीसाठी नागरिक झटत आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाला राज्यात सर्वत्र सुरवात झाली. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंदी चित्रपट श्रुष्टीतील दिग्गज अभिनेते अमीर खान यांनी सपत्नीक सावर्डे गावाला भेट दिली आणि नागरिकांची मनमोकळेपणाने संवाद साधत पाण्याचं महत्व पटवून दिल. यावेळी बोलताना ते म्हणाले ५ वर्षांपूर्वी पाणी फौंडेशन च्या या स्पर्धेची  सुरवात करताना भीती वाटत होती. लोक येतील का? काम करतील का यासह अनेक प्रश्न सतावत होते. पण ज्या वेळू गावात एका वर्षांपूर्वी ७५ वेळा हातपंप मारल्यावर पाणी येत होतं तेच पाणी आता एका हातपंपामध्ये येत. हा चमत्कार आहे. यावेळी जर एका वेळी पंप मारल्यावर पाणी नाही आलं तर मी अभिनय सोडेन असे आव्हान दिले होते. मात्र लोकांच्या कष्टाच्या व गावच्या एकीच्या बळावर हे सर्व शक्य झाले आहे. तुम्ही जे काम करताय ते महाराष्ट्र बघेल व त्यांना प्रेरणा मिळेल. आपल्या आपल्या ताकतीने गावं पाणीदार होत आहेत. त्याचा आनंद सांगू शकत नाही व त्याची किंमत होऊ शकत नाही. आमच्या अडचणींवर आपणच मार्ग शोधून एलाज करू शकतो. प्रशासनालाही त्यांनी यावेळी धन्यवाद दिले.  जनता व प्रशासन एकत्र आल्यास अशक्य काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले. सावर्डे येथे अभिनेता आमिर खान पत्नी किरण राव हे येणार असल्याची माहिती कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती कोणालाही देण्यात आली नाही. तासगाव मध्ये येण्याअगोदर काही मिनिटेच आमिर खान येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासन, पाणी फाउंडेशन ची टीम व ग्रामस्थांना देण्यात आली तरीही या दोघांना पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांनी हजेरी लावली.

Leave a Comment