आमिर खानची मुलगी इरा खानचा अतरंगी फोटोशूट !!!

0
48
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमिर खानची मुलगी इरा खान फिल्म इंडस्ट्रीपासून खूप दूर आहे.तरीही सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहेत. इरा खान बर्‍याचदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत राहते. पुन्हा एकदा इराची काही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मिस्टर परफेक्शनिस्टची मुलगी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे.या चित्रांमध्ये चाहत्यांना तीची अदा खूपच आवडली आहे.

 

इरा खानच्या फॅन क्लबने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत. छापील गाऊनमध्ये दिसणारी आमिर खानची मुलगी या फोटोमध्ये बरीच सुंदर दिसत आहे. या फोटोत इरा खानने अतिशय सुंदर असे आउटफिट परिधान केले आहे. इराच्या या चित्रांवर चाहत्यांकडून बर्‍याच कमेंटही केल्या जात आहेत.

 

बॉलिवूडच्या इतर स्टार किड्सप्रमाणेच आमिर खानची मुलगी इरा खानला देखील बॉलिवूडमध्ये करिअरकरायचे आहे,पण तिला अभिनयात नव्हे तर दिग्दर्शनात करिअर करायचे आहे. तिने या गोष्टीसाठी पूर्ण तयारी देखील केली आहे. तिचे पहिले नाटक ‘यूरिपाईड्स मेडिया’ डिसेंबर 2019 मध्ये रंगले होते. या नाटकात युवराज सिंगची पत्नी अभिनेत्री हेजल कीचसुद्धा दिसली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here