हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभर कोरोनाने थैमान घातले असतानादेखील सर्वांनी पाणी फाऊंडेशनचे काम करीत आपलं गाव समृद्ध केले. यामुळेच समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गावांनी चांगले काम केले आहे, अशा गावांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पध्दतीने दि. २२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार असल्याची माहिती अभिनेते आमिर खान पत्नी किरण राव यांनी शनिवारी एका वृत्तवाहिणीच्या मुलाखतीत दिली. तसेच त्याबाबत ग्रामस्थांना पत्रही पाठवल्याचे ते म्हणाले.
अमीर खान म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अतिशय कष्ट घेतल्यामुळे आज आपल्या गावाला पाण्याच्या रुपात बक्षीस मिळाले आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. अशा पाणीदार झालेल्या जवळपास ९०० गावांसाठी पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली आहे. आपण सर्व जण जाणताच की प्रशिक्षण आपल्या सर्व कामाचा आत्मा राहिला आहे. गत स्पर्धेमध्ये प्रशिक्षण घेऊन गावी गेलेल्या प्रशिक्षणार्थींनी अशक्य ते शक्य करून दाखविले. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईलाजाने प्रशिक्षण हे प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रावर न घेता ऑनलाइन पद्धतीने घ्यावे लागले. आम्हाला खूप आनंद आहे की या संकटाला न घाबरता हजारो जलयोद्ध्यांनी हे प्रशिक्षण गावपातळीवर पूर्ण केले. यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपणास करावा लागला याची आम्हाला जाणीव आहे.
अनेक गावांत नेटवर्क मिळत नसे. तरी आपण ज्ञान घेण्याची जिद्द सोडली नाही. काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढून, तर काही ठिकाणी टेकडीवर चढून रेंज येते तेथे बसून आपण प्रशिक्षण घेतले. एका गावामध्ये असणारा बसथांबा हा चांगले नेटवर्कचे ठिकाण असल्याने प्रशिक्षण केंद्र बनला. कधी जोराचा पाऊस आला तेव्हा लॅपटॉपवर छत्री धरून आपण प्रशिक्षण पूर्ण केले. अशा आव्हानांना तोंड देत आपण समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे काम करण्यास सज्ज झालात.
नुकताच करण्यात येणार गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पध्दतीने दि. २२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. सदर सोहळा पानी फाउंडेशनच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/paanifoundation
तसेच पानी फाउंडेशनच्या युट्युब लिंकवर https://www.youtube.com/paanifoundation पाहू शकता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group