मुंबई | कॉमेडी म्हंटल की आपल्याला वाटतं तितकी सोप्पी गोष्ट नसते त्यासाठी असाव लागतं प्रचंड नॉलेज आणि निरीक्षण क्षमता. आपल्यातील सुप्त गुण ओळखता आले तर माणूस यशाचं शिखर कोणत्याही वयात गाठू शकतो. याचाच प्रत्यय देत अमित बढाना या तरुणानं युट्यूबवर लक्षणीय कामगिरी करत भारतात नंबर एकचं स्थान मिळवलं आहे. “मास्टर भी कहदे इसे ना पढाना नाम है अमित भढाना” या डायलॉगसह देशभर पोहोचलेला अमित आता भारताचा “युट्युब किंग” बनला आहे.
युट्युबने सादर केलेल्या केलेल्या एका रिपोर्टनुसार अमित बढाना भारतातील सर्वात लोकप्रिय युट्यूबर असल्याचं समोर अालं आहे. अमितने आज तरुणांनाच नव्हे तर विविध वयोगटांच्य लोकांना आपल्या विनोदी शैलीने भुरळ घातली आहे. आपल्या “गुजर” भाषेत कॉमेडी करून कायद्याच शिक्षण घेऊनही अमित ला काहीतरी वेगळं हटके करायचं होतं. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मधून आता अमितला त्याच्या कष्टाचं फळ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही.
आपल्या कॉमेडी कौशल्याने अमितने तरुणाईसह सर्वांचीच मने जिंकत आला आहेत. अमितच्या चाहत्यांमध्ये सतत होणारी वाढ ही अमितसाठी आनंदाची बाब आहे. अमित भडाना ने 2018 मध्ये 1.18 करोड सबस्क्रायबर्सची साथ मिळवत यूट्यूब क्रिएटर्सच्या यादीत सर्वोच्च जागा मिळवली आहे. अमित लहान पणापासूनच कॉमेडी होता. तो जेव्हा लोकांना हसवायचा तेव्हा लोकही त्याला पाहून म्हणायचे हा मुलगा कॉमेडी मध्ये काहीतरी वेगळं करून दाखवेल.व्हिडिओ तर सगळेच बनवतात पण अमितने फक्त व्हिडीओ न बनविता त्याची नस ओळखून सगळे व्हिडिओ व्हेज बनवले जेणेकरून ते व्हिडीओ तरुणांच्या पालकांनी पाहिले आणि भरभरून त्यांना हसवलं. त्यामुळे अमितच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून युट्युब हिंदी वाइन्स चा बादशहा असलेला भुवन बमकडे 1.12 युट्युबसबस्क्रायबर होते त्यांना अमित ने मागे टाकत 1.18 करोड सबस्क्रायबर वाढवत आपले स्थान सर्वोच्च केले आहे.
इतर महत्वाचे –
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल
इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?