कोहलीच्या स्वभावामुळेच त्याला कमी मित्र; अमित मिश्राने सांगितला रोहित आणि विराटमधील फरक

amit mishra virat and rohit
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … एकाच नाण्याच्या २ बाजू… भारतीय क्रिकेटमधील दोघेही दिग्गज खेळाडू… दोघांची तुलना करणं तस अवघडच…. जे विराटला जमते ते रोहित करू शकत नाही आणि जे रोहित करू शकतो ते विराटला कधी जमलं सुद्धा नाही… त्यामुळे दोघांत महान कोण यावरून दोन्ही खेळाडूंचे फॅन्स अक्षरश भांडताना सुद्धा आपण बघितलं आहे. मात्र आता भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने (Amit Mishra) विराट आणि रोहित या दोघांच्याही स्वभावातील फरक सांगितला आहे. विराट कोहली हा आधीपेक्षा खूप बदलला आहे तर रोहित शर्मा मात्र आधी होता तसाच अगदी साधा आहे असं अमित मिश्राने म्हंटल.

यूट्यूब शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमित मिश्रा म्हणाला, विराट कोहलीचे भारतीय संघात फारसे मित्र नाहीत आणि ‘फेम आणि पॉवर’मुळे तो बदलला आहे. मात्र दुसरीकडे रोहितला प्रसिद्धी आणि दर्जा मिळाला असला तरीही तो पूर्वीसारखाच आहे. मी रोहित शर्माशी केव्हाही बोलू शकतो आणि त्याच्यासोबत मजा करू शकतो. मात्र कोहली आणि रोहितच्या स्वभावात फरक असल्यामुळे भारतीय संघात विराट कोहलीचे कमी मित्र आहेत असेही अमित मिश्रा याने सांगितलं.

मिश्रा पुढे म्हणाला, एक क्रिकेटर म्हणून मी विराट कोहलीचा खूप आदर करतो, पण आता माझं त्याच्याशी पूर्वीसारखं नातं राहिलेलं नाही. “मी चिकू 14 वर्षांचा असल्यापासून ओळखतो, जेव्हा तो समोसे खात होता, जेव्हा त्याला रोज रात्री पिझ्झाची गरज भासत असे, पण जो चिकू मी ओळखतो आणि कर्णधार विराट कोहली त्यात खूप फरक आहे. विराटला मित्र कमी का आहेत? याचे कारण आहे ते म्हणजे रोहित आणि त्याच्या स्वभावातील फरक…. मी अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग नाही. तरीही जेव्हा मी रोहितला आयपीएल किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात भेटतो तेव्हा तो नेहमी माझ्याशी विनोद करतो. रोहित काय विचार करेल याचा विचार करण्याची मला गरज नसते.

दरम्यान, अमित मिश्रा हा भारताचा माजी लेग स्पिनर आहे. त्याने भारतासाठी 22 कसोटी आणि 36 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अमित मिश्रणे त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये खेळला होता. आयपीएलमध्येही त्याची कारकीर्द चांगली राहिली आहे.