वाढदिवसानिमित्त अमित शहांवर शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायूष्य देवो अशा शब्दात मोदींनी शाह यांना शुभेच्छा दिल्या.

कर्मठ, अनुभवी, कुशल संगठनकर्ता आणि मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अमित शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायू आणि प्रकृती नेहमी उत्तम ठेवो, असं ट्विट मोदींनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्याकडून अशाच प्रकारे देशाची सेवा होत राहो, असं गडकरींनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही शाह यांना शुभेच्छा देताना दिर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. याशिवाय अन्य अनेक नेत्यांनी शाह यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ साली झाला. आज ते ५५ वर्षाचे झाले आहेत . त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment