चंद्रकांतदादांनी भरला हुंकार; अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईलचं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । अमित शाहांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून जोरदार उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ते पुण्यात बोलत होते.

वैभववाडीमध्ये १७ पैकी १७ सदस्य भाजपचे आहेत, राणे साहेब भाजपचे नेते झाले, त्यांचा मुलगा आमदार झाले. १७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेले हे जाणं येणं त्या त्या वेळी होत असतं. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल आणि वैभववाडीत ६ नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

सिंधुदुर्गातील नगरसेवक शिवसेनेत जाणे आणि अमित शाह यांचे वक्तव्य याचा कसलाही संबंध नाही,अमित शाहांच्या पायगुणाने सरकार जाणार असेल ते जाईल अमित शाह यांनी शिवसेना संपण्याची भाषा केली नाही, पण मागच्या १५ महिन्यात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असं वक्तव्य त्यांनी केले आणि ही वस्तूस्तिथी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. भाजपला कुणाला घाबरण्याचे कारण नाही.

“अमित भाईंनी शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं, आवाहन करणं किंवा सरकार आहे. तेव्हा जुने हिशेब काढण्याचा तो मुद्दा होता. तरीही शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवणार, मसनात गेले, काय काय बोलले”. अमित भाई असं व्यक्तीमत्व आहे, भाजप हा पक्ष कुणाला घाबरत नाही. जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment