Take a fresh look at your lifestyle.

‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?

टीम हॅलो महाराष्ट्र । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन पार पडत आहे. आज सकाळी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनाचे उदघाटन केलं असून संध्याकाळी ते भाषण करणार आहेत. यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा अमित ठाकरे यांच्याबद्दल काय घोषणा होणार याकडेही आहेत.

अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबद्दल बोलताना, अमित ठाकरे यांच्यावर राजकीय जबाबदारी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आम्ही तशी इच्छा व्यक्त केली आहे. पण अंतिम निर्णय राज ठाकरे यांचा असेल असं स्पष्ट केलं आहे.

अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण; नव्या झेंड्यावर शिवमुद्राचं

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

भारताच्या अर्थमंत्र्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी