हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या कार्यामुळे आणि सोशल मीडियावरच्या सक्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी , 7 फेब्रुवारी 2025 रोजी केलेल्या एका ट्विटमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. बिग बींच्या ट्विटरवर “जाण्याची वेळ आली आहे…” असे लिहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॉलिवूडच्या सुपरस्टारने असं का लिहले आहे , असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. तर चला नक्की हा विषय काय आहे , याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात .
अमिताभ बच्चनचे ट्विट –
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 82 वर्षाचे असून , हे नेहमीच आपल्या विचार आणि भावना सोशल मीडियावर शेअर करतात. पण त्यांच्या या ट्विटमध्ये “जाण्याची वेळ आली आहे” असे म्हटल्यावर चाहत्यांनी आश्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पोस्ट त्यांनी 7 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.34 वाजता शेअर केली आहे. काही चाहत्यांनी चिंता व्यक्त करताना, “असं बोलू नका साहेब,” “काय झाले सर ?” तुम्ही असं का बोलत आहात आणि “सरजी, तुम्ही जे लिहित आहात त्याचा अर्थ काय?” असे चाहत्यांनी भरमसाठ msg केले आहेत.
कौन बनेगा करोडपती शोचे होस्ट –
अमिताभ बच्चन यांनी या ट्विटचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 16’ या शोचे होस्ट करत आहेत, आणि त्यांच्या आगामी प्रकल्पांबद्दल चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरील या ट्विटने एक गूढ वातावरण निर्माण केले आहे, आणि त्याच्या माघील कारण काय आहे, हे केवळ अमिताभ बच्चन सांगू शकतात.