Amitabh Bachchan Property At Ayodhya : महानायक अमिताभ बच्चन यांनी खरेदी केला अयोध्या नगरीत प्लॉट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amitabh Bachchan Property At Ayodhya  : आयोध्येत प्रभू राम यांचे भव्य मंदिर उभारले आहे. सध्या देशभर याच मंदिराची चर्चा असून येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उदघाटन होणार आहे. संपूर्ण देशात हा सोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची तयारी सुरु आहे. अशातच आता आयोध्यानगरीत आपले घर असावे अशी कुणाची इच्छा होणार नाही…? महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Property At Ayodhya) यांनाही राम नगरीत प्लॉट विकत घेतल्याची माहिती आहे.

होय…! महानायक अमिताभ बच्चन यांनी आयोध्या मध्ये प्लॉट विकत घेतल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबई येथील डेव्हलपर दि हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याद्वारे आयोध्येत 7-स्टार एन्क्लेव्ह द शरयूमध्ये एक प्लॉट विकत घेतला आहे.

१४ कोटी रुपयांचा प्लॉट

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी (Amitabh Bachchan Property At Ayodhya)आयोजित घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केलाय. मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7-स्टार एन्क्लेव्ह द शरयूमध्ये मध्ये एक भूखंड खरेदी केलाय. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील व्यवहाराची माहिती असलेल्या लोकांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट ने ही माहिती दिली आहे की अमिताभ बच्चन हे अंदाजे १०,००० स्क्वेअर फुटांचे घर बांधणार आहेत आणि त्याची किंमत 14.5 कोटी रुपये आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्याच दिवशी प्रोजेक्ट शरयूचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्यातील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा उद्घाटन करणार आहेत. प्रोजेक्ट शरयू हा 51 एकरामध्ये पसरलेला आहे. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Property At Ayodhya) यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला असून मुंबईत त्यांचं घर आहे मात्र देशभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्येही त्यांची मालमत्ता आहे.

प्रकल्प कधी होणार पूर्ण ?

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन या गुंतवणुकीबद्दल बोलताना म्हणाले की आयोध्याचं माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. दुसरीकडे एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की शरयूचे प्रथम नागरिक म्हणून आम्ही बच्चन यांचे स्वागत करतो. हा प्रकल्प राम मंदिरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या एन्क्लेव मध्ये ब्रूकफिल्ड ग्रुपचे लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट च्या भागीदारीत एक पंचतारांकित पॅलेस हॉटेल देखील असेल. हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

एका रिपोर्टनुसार, अयोध्येमध्ये प्रॉपर्टीच्या किमती (Ayodhya Property Rates) किंवा दरामध्ये तिप्पट-चौपट वाढ झाली आहे. रिअल इस्टेट एक्स्पर्ट्सच्या सांगण्यानुसार, ही वाढ आता रॉकेटच्या वेगाने वर जाईल. कारण बाहेरच्या गुंतवणूकदारांप्रमाणेच (Amitabh Bachchan Property At Ayodhya)स्थानिक खरेदीदारसुद्धा आता प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. मोठ-मोठ्या हॉटेल ब्रँड्ससह अनेक रिअल इस्टेट कंपन्यानांही अयोध्येत गुंतवणूक (Ram Mandir) करायची आहे.

अयोध्येच्या बाहेरही वाढला जमिनींचा दर

केवळ आयोध्येतच नाही तर अयोध्येच्या बाहेर देखील जमिनी महागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही दरवाढ इतक्यात कमी होणार नाही. खरंतर, अयोध्या (Ram Mandir) शहरात ज्या जमीनीचा दर 1000-2000 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट इतका होता तो आता 4000-6000 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट इतका झाला आहे. तर फैजाबाद रोड क्षेत्रातील ज्या जमिनीचा दर 400-700 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट इतका होता तो आता वाढून 1,500-3000 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट एवढा झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती चौदह कोसी परिक्रमा आणि रिंग रोड जवळही आहे.

अयोध्येत वाढणार खासगी गुंतवणूक 

आयोध्या येथे सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेसोबतच खासगी रियल इस्टेट डेव्हलपर्स ही या शहरांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत मुंबई स्थित रियल इस्टेट डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा धार्मिक शहरात म्हणजेच अयोध्येत (Ram Mandir) बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहेत प्लॉट केलेला विकास 25 एकरमध्ये पसरला जाईल. अशी माहिती आहे. शिकवाय टाटा समूह आणि इतर मोठे समुह या भागात एका रिपोर्टनुसार, अयोध्येमध्ये प्रॉपर्टीच्या किमती (Ayodhya Property Rates) किंवा दरामध्ये तिप्पट-चौपट वाढ झाली आहे. रिअल इस्टेट एक्स्पर्ट्सच्या सांगण्यानुसार, ही वाढ आता रॉकेटच्या वेगाने वर जाईल. कारण बाहेरच्या गुंतवणूकदारांप्रमाणेच स्थानिक खरेदीदारसुद्धा आता प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. मोठ-मोठ्या हॉटेल ब्रँड्ससह अनेक रिअल इस्टेट (Amitabh Bachchan Property At Ayodhya) कंपन्यानांही अयोध्येत गुंतवणूक (Ram Mandir) करायची आहे.