Wednesday, February 1, 2023

KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांना बरं वाटत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, सेटवरील एक बाहेर निघालेला धातूचा तुकडा त्यांच्या पायाला घासला गेला आणि त्यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली अशी माहिती बच्चन यांनी दिली. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्यांच्या जखमेवर काही टाके घालण्यात आले. ते आता पूर्णपणे बरे आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पायावर जोर देऊ चालण्यासही मनाई केली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त केबीसीच्या टीमने एका खास एपिसोडचे आयोजन केले होते. यामध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचाही सहभाग होता.