आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिरूर प्रतिनिधी | २००४ ते २०१९ असा प्रदीर्घ काळ लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जनता यावेळी घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले त्या मतदानाच्या एकंदर वातावरणावरून अमोल कोल्हे यांना जनता यावेळी लोकसभेत पाठवायच्या मूड मध्ये असल्याचे बोलले जाते  आहे.

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

शिवाजीराव आढळराव पाटील जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले होते तेव्हा त्यांना अवघ्या काही हजारांचे मताधिक्य मिळाले.  आढळराव पाटील यांनी दुसऱ्या वेळी कामाच्या बळावर एक लाखाहून अधिकचे मताधिक्य घेतले. तर तिसऱ्या वेळी २०१४ साली मोदी लाटेमुळे  आढळराव पाटील २ लाखां पेक्षा अधिक मताधिक्य मिळवले. मात्र शेवट्या पंचवार्षिकमध्ये आढळराव पाटील मतदारसंघात फिरकलेच नाहीत असा आरोप खुद्द मतदारांनीच त्यांच्यावर केला आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांच्या सारखा उमेदवार देवून आढळराव पाटलांच्या वर्मी घाव दिला आहे.

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

आज पार पडलेल्या मतदानात आढळराव पाटील यांना हडपसर आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघात चांगले मतदान झाले मात्र खेड,आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या भागात मात्र मतदार राष्ट्रवादीच्या बाजूने उभा राहिले असण्याची शक्यता जाणकार सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच असणार आहे. तर कदाचित अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अमोल कोल्हे यांचा वर चष्मा होण्याची दाठ शक्यता आहे.

 

Leave a Comment