भाजपची मस्ती आणि माज उतरल्याशिवाय राहणार नाही; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. दरम्यान आता भाजप व महाविकास आघाडीतील आमदारांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आज मतदानानंतर पहायला मिळेल कि भाजपची मस्ती आणि माज उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी आज विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपने कितीही साम, दामआणि दंडाचा प्रयोग केला तर राज्यसभेच्या वेळी जे केले ते यावेळेस होणार नाही. या निवडणुकीत भाजपला नक्कीच फटका बसणार आहार. कारण पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमधील काही आमदार नाराज आहेत.

एकनाथ खडसे यांच्या संपर्कातील काही आमदार भाजपवर नाराज आहेत. त्याचा फटका भाजपला बसणार असून तो सायंकाळी नक्की दिसेल. दरम्यान, आज होत असलेल्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान करण्यासाठी सर्व आमदार मुंबईत हजर झाले आहेत. विधान भवनात राजकीय पक्षांकडून आपापल्या आमदारांवर लक्ष ठेवले जात आहे.

Leave a Comment