सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली? अमोल मिटकरींची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे. सदाभाऊंना आमदारकी टिकवायची आहे म्हणून ते पवार साहेबांवर अशी टीका करत आहेत, सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली? असा टोला मिटकरी यानी लगावला. अमोल मिटकरी हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात काही उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

“शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत…तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे,” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहीत आहे. काश्मीर फाईलच्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आता सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. शरद पवारांनी काय केलं ते सोडा, पण सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली हा विषय आहे असे मिटकरी म्हणाले.

Leave a Comment